खारेपाटण पुरग्रस्थांना संस्कृती प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातुन मोफत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप..

कणकवली /-

"आज कोकणवर महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे त्याने जनतेचे कधीही न भरुन येणारे असे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना हव्या असलेल्या मदतीची जाणीव ठेऊन मुंबईवरुन 500 किलोमीटर खारेपाटण येथे येऊन संस्कृती प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने गरजु लोकांना जिवनावश्यक वस्तूंची केलेली भरीव मदत कौतुकास्पद आहे. समाजकार्याचा हा निस्वार्थी वसा असाच पुढे सुरु राहो आणि या प्रतिष्ठानतर्फे भविष्यातही असेच स्तुत्य उपक्रम सुरु राहोत अशी आशा बाळगुन पुरग्रस्तांच्या तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानतो," असे गौरवोद्गार शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या खारेपाटण येथील पूरग्रस्तांना मोफत जिवनावश्यक वस्तु वाटप कार्यक्रमावेळी काढले. संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्ट कांजूरमार्ग मुंबई यांच्यावतीने शिवसेनेच्या माध्यमातुन आज खारेपाटण येथील पुरग्रस्त कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खारेपाटण येथील महापुराची झळ पोचलेल्या विविध ठिकाणच्या 50 गरजु पूरग्रस्त कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये प्रत्येकी 35 प्रकारच्या जिवनावश्यक वस्तु पुरग्रस्त कुटुंबियांना देण्यात आल्या. खारेपाटणसह चिपळुण व महाड पुरग्रस्तांना देखील मदत केल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पूरग्रस्तांनी संस्कृती प्रतिष्ठान मुंबईचे आणि शिवसेनेचे आभार मानले. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, माजी सभापती संदेश पटेल, कणकवली युवासेना समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, शिवसेना खारेपाटण विभागप्रमुख गोट्या कोळसुलकर, संस्कृती प्रतिष्ठान मुंबईचे तृप्तेष शिरोडकर, शैलेश तारकर, महेश सावंत, अमोल परब, अभय खानविलकर, संतोष गोणबरे, रोशन बांबरकर, मनिषा कोल्हे, काजल पाटील यांच्यासह युवासेना विभागप्रमुख तेजस राऊत, शिवसेना शाखाप्रमुख शिवाजी राऊत, दिगंबर गुरव, संतोष तुरडकर, गिरीश पाटणकर, महिला आघाडीच्या सायली तुरळकर, प्रसाद गाटे, श्रीजय कोळसुलकर, प्रज्योत मोहिरे भूषण कोळसुलकर, धोंडीराम साटविलकर, गोटया चव्हाण, संदीप ढेकणे, हुसेन मुकादम, शबाना ठाकुर, ठाणगे, रज्जाक मुकादम, बाऊ काझी, शेमणे, सुऱ्या सांरग, चेतन वाडेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page