वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल १०० टक्के लागला असून वेतोरे श्री देवी सातेरी हायस्कुल व कै. सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी मनाली रामचंद्र कुबल हिने ५८३ (९७.१७ टक्के) गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

वेतोरे कै. सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे मधून १२७ पैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे.यामध्ये कला शाखेतून प्रथम निमय दिनेश अणसुरकर ८५.३३%,द्वितीय
स्नेहा अरुण मोहिते ७४.३३%,तृतीय आकाश शशिकांत खानोलकर ७३%.
वाणिज्य शाखा प्रथम मनाली रामचंद्र कुबल ९७.१७ %,द्वितीय श्वेता संजय घारे ९३%,तृतीय दया लक्ष्मण पालव ९१.८३%. विज्ञान शाखा प्रथम वैष्णवी शिवराम वराडकर ९४%,द्वितीय श्रावणी संजय बागायतकर ९३.८३%,तृतीय संयुक्त श्रीधर अरविंद बागायतकर व सुजन केतन प्रभू खानोलकर ९१.६७%,चतुर्थ वेदांत सुनिल नाईक ९०.३३%, पाचवा क्र.वेदांग महेश बोवलेकर ९० % मिळविले आहेत.

बा. म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा मधून २९६ पैकी २९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये व्होकेशनल शाखा प्रथम संयुक्त शारदा प्रमोद नाईक व पल्लवी पांडुरंग केरकर ९१.५०%,द्वितीय सिया सावळाराम सातोस्कर ९०%, तृतीय गणेश संतोष नाईक ८७.५०%.विज्ञान शाखा प्रथम आत्माराम चंद्रकांत कांबळी ९२.१६%,द्वितीय श्वेता अवधूत येनजी ८७.६६ %,तृतीय व्यंकटेश सिताराम राणे ८६.८३%. वाणिज्य शाखा प्रथम अनघा श्रीगुरु प्रभू साळगावकर ९२.६६%,द्वितीय मैथिली भरत गावडे ८७.५०%,तनया संतोष कांबळी ८५.५०%. कला शाखा प्रथम रेवती प्रकाश सारंग ७५.१६%,द्वितीय प्रीती दिलीप कुबल ७२.५०%,तृतीय प्रतीक्षा सिताराम जोशी ६६.३३%.

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले मधून २६६ पैकी २६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये विज्ञान शाखा प्रथम सेजल ज्ञानेश्वर अणसूरकर ९५.१६%,द्वितीय प्रणव गोपाळ दाभोलकर ९२%,तृतीय सानिका प्रकाश कांबळे ९०.३३%.वाणिज्य शाखा प्रथम हृतिका बाळा मेस्त्री ८८.१६%,द्वितीय सानिका परशुराम भांगले ८७.६६%,तृतीय अभय दयानंद वेंगुर्लेकर ८७.३३%.कला शाखा प्रथम रुपाली यशवंत मोकाशी ८६.१५%,द्वितीय दिक्षा मदन कुबल ८६%,तृतीय संजना सुनिल परब ८४.१६%.एम.सी.व्ही.सी.प्रथम मंथन प्रविण देसाई ८४.३३%,द्वितीय कृष्णा मारुती राऊळ ८२.३३%,तृतीय साहिल गोपाळ मोबारकर ८१.३३%.

आर.एस.रेगे ज्यु. कॉलेज वेंगुर्ला मधून ११४ पैकी ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये कला शाखा प्रथम विनायक संतोष कांबळी ६३.६७%,द्वितीय हर्षल मदन खोबरेकर ६०%,तृतीयनिकिता सुनील खोबरेकर ५९%. वाणिज्य शाखा प्रथम चैताली मिलिंद निकम ८३%,द्वितीय सलोनी राजाराम मुणगेकर८२.८३%, तृतीय शितल किरण कारेकर ८२.६७%.व्यवसाय अभ्यासक्रम प्रथम आर्यन सुभाष धुरी ७७.३३%,द्वितीय मेरी कैतान फर्नांडिस ७४.३३%,तृतीय यशश्री श्याम खोबरेकर ७१.८३% गुण मिळविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page