कणकवली /-

स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर यांची निवड करण्यात आली. पुढिल तीन वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन उपस्थितांमधुन नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नविन निवडलेली कार्यकारिणी पुढिलप्रमाणे : विनय केशव पावसकर (अध्यक्ष), नारायण परशुराम वळंजू (उपाध्यक्ष), मिनेश बलवंत तळेकर (सचिव), तर सदस्यपदी डॉ. अभिजित बाळकृष्ण कणसे, मुकेश भास्कर साटम, सौ. रेश्मा हनुमंत तळेकर, सौ. श्रावणी सतिश मदभावे, ध्रुव श्रावण बांदिवडेकर, हेमंत सुभाष महाडीक यांची निवड करण्यात आली. यावेळी नविन कार्यकारिणीच्या निर्णयानुसार सल्लागार समिती आणि प्रसिध्दी समिती निवडण्यात आली. सल्लागार समितीमध्ये रमाकांत वरुणकर, शशांक तळेकर, डी. एस. पाटिल, सौ. सीमा पोकळे, अशोक मुद्राळे, सुर्यकांत तळेकर यांची तर प्रसिध्दी समितीमध्ये निकेत पावसकर, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड, उदय दुदवडकर, प्रमोद कोयंडे, नितीन तळेकर, गुरुप्रसाद सावंत यांची निवड करण्यात आली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विनय पावसकर म्हणाले की, वाचनलायाने 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या कालखंडात आपल्या वाचनालयाची यशस्वी वाटचाल झालेली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने याहीपुढे अधिकाधिक चांगले काम केले जाईल. यावेळी नविन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page