कणकवली /-

नाटळ येथील मल्हार पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे . तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या याचा मोठा विपरीत परीणाम होत असून भविष्यातही तो होणार आहे . तरी वरील नमुद सर्व बाबींचा सारासार विचार करून तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर गणेश चतुर्थी सणाच्या आधी मल्हार पूलावर साकव अथवा नजीकच पर्यायी ठिकाणी साकव बांधण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी नरडवे सरपंच अमिता सावंत ,नाटळ सरपंच सुजाता सावंत ,दिगवळे सरपंच सानिका सुतार ,दारीस्ते सरपंच संजय सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. कणकवली येथील बांधकाम विभाग कार्यालयात भेट देत सरपंचांनी मल्हार पुलावरील साकवाबाबत लक्ष वेधले. यावेळी सरपंच यांच्यासोबत माजी सभापती सुरेश ढवळ व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कनेडी नरडवे मार्गावरील नाटळ मल्हार पूल हा 22 जूलै रोजी अचानक कोसळल्याने आता नाटळ , दिगवळे , दारीस्ते , नरडवे या प्रमुख गावांचा पूर्णपणे सपंर्क तुटलेला असून त्याबरोबरच अन्य छोटी- मोठी आठ ते नऊ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे . त्यामुळे ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात हाल होत असून , आर्थिक भूर्दडही पडत आहे.त्यामुळे पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्यासंदर्भात 26 जुलै 2021 रोजी यावरील उपाययोजनेंसदर्भात जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं.सांगवे येथे आढावा बैठक घेण्या आली होती.सदर बैठकीमध्ये कोसळलेल्या मल्हार पूलाचे स्ट्रकचरल ऑडीट करून त्यानुसार सदर पूलावर तात्पुरत्या स्वरूपातील साकव बांधणे शक्य आहे कींवा नाही हे सांगता येइल असे सांगीतले होते . तसेच यासांदर्भातील अंदाजपत्रकही त्यानंतर करणे शक्य होईल याबाबतही चर्चा करण्यात आली होती.याचे स्ट्रकचरल ऑडील लवकरात लवकर करण्याचीही यावेळी ग्वाही दिलेली होती . तथापी अदयाप याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही . तसेच पर्यायी व्यवस्थेबाबतही कार्यवाही झालेली दिसत नाही . यामुळे ग्रामस्थामध्ये याबाबत साशंकता आहे.पर्यायी साकव कीती दिवसात हाईल हे देखील समजत नाही.जर सदर पूलाचे स्ट्रकचरल ऑडीट आपले यंत्रणेमार्फत झाले असल्यास व सदर ठिकाणी तात्पूरत्या स्वरूपातील साकव ज्यावरुन लहान वाहने उदा.दुचाकी , रीक्षा हे जाण्यायोग्य असा साकव बांधणे शक्य नसल्यास सदरच्या पूलाजवळच अन्य ठिकाणी अशा प्रकारचा साकव बांधणेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून तो तात्काळ बांधणेची कार्यवाही करावी.जेणेकस्न आता पूलाच्या पलीकडे असलेल्या नाटळ , दिगवळे , दारीस्ते , नरडवे व अन्य गावातील ग्रामस्थांना सध्या उदभवत असलेल्या अडचणी – तात्पुरत्या स्वरूपात तरी दूर होतील . आता नजीकच कोकणातील अत्यंत महत्वाचा असा चतुर्थी सण येत आहे . सदर सणानिमित्त मुंबईहून मोठया प्रमाणत चाकरमानी येण्याची शक्यता आहे . तरी वरील नमुद सर्व बाबींचा सारासार विचार करून तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर गणेश चतुर्थी सणाच्या आधी मल्हार पूलावर साकव अथवा नजीकच पर्यायी ठिकाणी साकव बांधण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page