माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे वैभववाडी आरोग्य विभागास निवेदन….

वैभववाडी /-

वैभववाडी येथील लसिकरण केंद्रावर सध्या १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींची लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणाचा लाभ मिळावा म्हणून अनेक युवक पहाटे ५ वाजल्यापासून लसिकरण केंद्रावर उपस्थित असतात.शनिवार वैभववाडी येथील लसिकरण केंद्रावरून अनेक वयोवृद्ध व्यक्तींना सकाळ पासून लसिकरण केंद्रावर उपस्थित असुन देखील रिकाम्या हाती परतावे लागले. ही खंत त्यांनी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या समोर व्यक्त केली.

लसिकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता तालुक्यातील वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना तरुणांच्या बरोबरीने पहाटे पासून लसिकरण केंद्रावर रांगेत उभे राहायला लावणे ही बाब माणुसकिच्या दृष्टीने अतिशय चुकीची व लाजिरवाणी आहे. एकप्रकारे ही त्यांची अवहेलना आहे. परिणामी त्यांना लसिकरणापासून वंचित रहायला लागू नये. शिवाय तालुक्यातील सर्व लसिकरण केंद्रावर त्यांचे प्राधान्याने लसिकरण केले जावे अशा मागणीचे निवेदन माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी आज आरोग्य विभागास दिले.यावेळी जयेंद्र रावराणे, आरोग्य अधिकारी अनिल पवार, माजी नगरसेवक संजय सावंत, प्राची तावडे, शुभांगी पवार, संदेश तुळसणकर व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page