सावंतवाडी /-

रोटरीने यावर्षी “महिला सबलीकरणा” वर विशेष भर देऊन त्यांना आणखी सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातुन या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यांनी एक नवी कल्पना मांडली. नेमके या महिलांच्या नजरेतुन कशा प्रकारे त्या सक्षम होऊ इच्छितात हे समजुन घेण्यासाठी एक अनोख्या स्पर्धेचे आयोजन यासाठी करण्यात आले आहे. यासाठी मुहुर्तमेढ रोहण्याच्या दृष्टिकोनातुन क्लबच्या महिला सदस्या रो.सौ.श्रीया नाईक यांचा सत्कार रोटरी अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार तर रो.विनया बाड यांचा सत्कार रो.सुहास सातोसकर यांच्या हस्ते करण्यात आला. 1 आॕगष्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी टिळकांच्या प्रतिमेला जेष्ठ रो.अनंत उचगावकर आणि रो.वसंत-करंदीकर यांच्या हस्ते हार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष रो.दिलीप म्हापसेकर यानी टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले आणि लोकमान्य टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच” हे त्यांचे ब्रिद वाक्य सांगताना आपल्या बाल मनावर टिळकांच्या विचारांचा प्रभाव पडल्याचे ते म्हणाले. “महिला सबलीकरण” या विषयावर बोलताना रो.अनंत उचगावकर यानी आनंदीबाई गोपाळ जोशी या तत्कालीन महिला सबलीकरणासाठी काढलेल्या खर्तांची आठवण करुन दिली. त्या काळात स्त्रीयाना शिक्षणा पासुन वंचित रहावे लागत होते. त्याकाळात तिचे पती गोपाळराव जोशी यानी आनंदीबाईना केवळ शिकवले नाही तर वैधकीय शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून त्याना एम्.डी. पर्यंतचे शिक्षण दिले. हे खरे महिला सबलीकरण होय याची या प्रसंगी आठवण करुन दिली. त्यानंतर महिला सबलीकरणासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या प्लायर आणि क्लिपचे उदघाटन रो.विनया बाड आणि रो.श्रीया नाईक यांच्या उपस्थितीत रो.अनंत उचगावकर यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा समाजातुन 3 मिनिटांच्या व्हिडिओतुन कशा प्रकारे “महिलां-सबलीकरण” करता येईल हे मांडून हा व्हिडिओ 31 आॕगष्ट पर्यंत पाठवायचे आवाहन वय वर्षे 21 वरील सर्व थरातील नागरिकांना यावेळी करण्यात आले. यावेळी रो.सत्यजित धारणकर, रो.प्रमोद भागवत, रो.प्रा.सचिन देशमुख,रो.प्रभाकर देसाई, रो.सुहास सातोसकर रो.आनंद रासम हजर होते. सुत्रसंचलनाची धुरा सचिव रो.सुधीर नाईक यानी समर्थपणे सांभाळली आणि इव्हेट चेअरमन रो.ॲड.सिद्धार्थ भांबुरे यानी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page