मंडळाचे अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर आणि सरचिटणीस विजय कांबळी यांचा पुढाकार..

कुडाळ /-

कुडाळ तालुका भंडारी मंडळ कुडाळ यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील बाव गावातील सुरभाचीवाडी येथील सोळा भंडारी समाजातील कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या पदाधिकारी यांनी वाटप केले.बाव सुरभाचीवाडी येथील सहा भंडारी कुटुंबातील लोकांना एका कार्यक्रमा दरम्यान कोरोना विषाणूची लागण झाली होती.यामध्ये त्यांची सर्व घरे कोरोन्ट|ईन केली होती.त्यामुळे त्या भंडारी समाज बांधवांची गैरसोय लक्षात घेऊन ,याची खबर कुडाळ तालुका भंडारी मंडळाचे सरचिटणीस श्री.विजय कांबळी यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री.गजानन वेंगुर्लेकर यांना दिली याची दखल घेत अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांनी घेत, “एक हात मदतीचा आपल्या भंडारी समजासाठी “असे ठरवून अध्यक्ष गजानना वेंगुर्लेकर आणि मंडळाचे सरचिटणीस विजय कांबळी यांच्या माध्यमातून आज शुक्रवारी दिनांक ३० जुलै रोजी कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या पदाधिकारी यांनी बाव सुरभाची वाडी येथे भेट देऊन त्या कुटुंबातील लोकांची विचारपूस करून मदतकार्य भंडारी समाजासाठी केले आहे.त्याच बरोबर बाव येथील पुराच्या पाण्यात शेतीचे नुकसान झालेल्या अजून १० कुटुंबातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.असे एकूण १६कुटुंबातील लोकांना आज भंडारी समाजाच्या वतीने एक हात आपल्या समाजातील बांधवांनसाठी देण्यात आला आहे.

यावेळी कुडाळ तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर ,उपाध्यक्ष राजन कोरगावकर ,सचिव शरद पावसकर सरचिटणीस विजय कांबळी ,भंडारी मंडळाचे सदस्य समील जळवी ,दर्शन कुडव ,दीपक राऊत ,नागेश करलकर,रमेश हरमलकर उपस्थित होते.तर तुळशीदास तुळसर ,निर्मला तुळसर ,सुप्रिया राऊत ,आकांक्षा करलकर ,बाळा हडकर बाबी हडकर ,सूर्यकांत जळवी,राधाबाई करलकर भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page