दोडामार्ग /-

कळणे गावात सध्या मायनिंग मोठ्या प्रमाणात चालते याच मायनिंग परीसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे.त्यामुळे भूस्खलन होवून तेथील काही भाग कळणे मायनिंगच्या खाणीत कोसळला.परीणामी खाणीतील पाणी व चिखलमय माती परीसरातील शेती व लोकवस्तीत शिरले आहे.परीसरातील रस्ते पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे रस्त्यावरुन वाहने हाकणे त्रासदायक होत आहे.आज खाणीतील पाणी,चिखलमय माती म्हणजेच पूर्णतह: कळणे मायनिंगच परीसरातील शेती व लोकवस्तीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असेच चित्र आज दिसून आले.
आज कळणे येथील लोकवस्तीत पाणी शिरल्याने बरेचसे नुकसान झाले.शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करण्याचे सोपस्कार पूर्ण करुन मलमपट्टी करण्याचे काम केले.मात्र घरात शिरलेले पाणी व चिखल याकडे कोणीही लक्ष दिले नाही.भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती होण्याची टांगती तलवार अजूनही ग्रामस्थांच्या डोक्यावर आहे.लोकांच्या जमिनित मातीचा भराव शिरल्याने जमिनी चिखलमय व विस्कळीत झाल्या आहेत.लाईटचे पोल पडले आहेत.विहीरीत चिखल साचल्याने पाणी प्रश्न आहे.त्यामुळे केवळ पंचनामे करुन व एखाद्या मायनिंग अधिकाऱ्याने थातुरमातुर उत्तरे देवून हा प्रश्न निकालात काढण्यापेक्षा स्थानिक ग्रामस्थांच्या व्यथा समजून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे व याकामी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत.
त्यामुळे शासन नियमांचे उल्लंघन करुन होत असलेले मायनिंग,त्यावर दुर्लक्ष करणारे मायनिंग अधिकारी व कार्यरत मायनिंग एजंट या सर्वांमुळे सदरील परीस्थिती उद्भवलेली असून त्यास हे सर्वजणच कारणीभूत आहेत.यासर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page