बांदा /-

कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील लोकांनी जीव धोक्यात घालत अनेकांचे जीव वाचवले. याची तातडीने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बांदा, इन्सुली भागातील लोकांसाठी ‘लाईफ जॅकेट’ पुरविण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या पुढाकारातून ही मदत देण्यात आली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पहाणी दौरा करत असताना पूरग्रस्त नागरिकांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कणयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझिर शेख, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, व्हीजीएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, उद्योग व व्यापार महिला तालुकाध्यक्ष मोहीनी देऊलकर, स्मिता मुळीक, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, संतोष जोईल, संतोष तळवणेकर, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, गौस मुल्ला, आल्फिया पटेल, बांदा ग्रामस्थ राकेश केसरकर, सुशांत पांगम, सौ. पांगम, यतीन धामापुरकर, प्रितम हरमलकर, श्री. खान, चेतन वेंगुर्लेकर आदी बांदा, इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page