वेंगुर्ला /-


महाराष्ट्र डिरेक्टोरेड एन.सी. सी. च्या वतीने देशभरातील एन. सी. सी. कॅडेटसाठी एक भारत श्रेष्ठ भारत हा राष्ट्रीय ऑनलाईन कॅम्प १९ जुलै ते २४ जुलै २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.सदर कॅम्पसाठी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविदयालयाच्या एन. सा. सी. विभागातील कॅडेट श्रीराम संतोष गावडे यास ५८ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी सिंधुदुर्ग ने सहभागी होण्याची संधी दिली होती. या कॅम्पमध्ये कारगिल विजय दिवस या थीमवरील काव्यवाचन स्पर्धेत कॅडेट श्रीराम संतोष गावडे याने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेत देशभरातील सुमारे तीनशे कॅडेटसनी भाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक कॅडेट श्रीराम संतोष गावडे तर व्दितीय क्रमांक दिल्लीची एअर फोर्स विंगमधील अतुजा खाकर हिने मिळविला.कॅडेट श्रीराम गावडे याचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सेंबर दौलतराव देसाई,प्रशासन अधिकारी प्रा.डॉ. मंजिरी देसाई मोरे यांनी अभिनंदन केले.तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी पुष्पगुच्छ देवून श्रीराम गावडे यांचे अभिनंदन केले.यावेळी एन. सी. सी. प्रमुख ले. डॉ. बी जी. गायकवाड, डॉ. आनंद बांदेकर, प्रा. देविदास आरोलकर, प्रा. वामन गावडे, प्रा. डॉ. मनिषा मुजुमदार, प्रा. व्हि. पी. नंदगिरीकर, प्रा. एल. बी. नैताम, सुरेंद्र चव्हाण, एन. सी. सी. कॅडेट श्रीपत गावडे, सिध्दांत शिरगावकर आदि उपस्थित होते. ही स्पर्धा ऑनलाईन झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page