घाट रस्ता खचू शकतो याकडे लक्ष द्यावे:अनिल चव्हाण

आंबोली /-

आंबोली घाटातील दरीच्या बाजूने ३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबल मुळे घाट खचला होता.त्या भेगा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा न केल्याने पुन्हा त्यात पाणी जावून खाचरे पडली आहेत त्यामुळे घाट रस्ता खचू शकतो या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी अनिल चव्हाण यांनी केली आहे. पावसाळ्यात पाणी दरिकडच्या बाजूने वाहून रस्त्याच्या भेगा पुन्हा पडू नयेत यासाठी काँक्रिट घाऊन भेगा तत्काळ बुजवने आवश्यक आहे. घाटातील ५ व्या किलोमीटरवर पहिल्या धबधब्याकडे वळणावर दरड कोसळण्याची शक्यता आहे त्याठिकाणी उपाययोजना करावी. घाटात ठिकठिकाणी दगड पडले आहेत ते हटवावे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.ठिकठिकाणी घाटात मोठे खड्डे पडले आहेत.घाटात रिफ्लेक्टर बसवले नाहीत.त्यामुळे धुक्यात रात्रीचे रस्त्याचा अंदाज येत नाही. यासंदर्भात अधिकाऱ्याकडे मागणी देखील केली होती. दानोली येथील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यातील पाण्यात खड्डे दिसत नसल्याने दुचाकी आदळत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page