कुडाळ /-

गेले दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थितीचा फटका बसला.कुडाळ तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. पावसाचा जोर आता कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तालुका दौरा करत पुराचे पाणी जाऊन ज्याठिकाणी नुकसान झाले त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

पावशी,आंबेडकरनगर, बिबवणे, नानेली व अन्य ठिकाणी उदभवलेल्या पुरस्थितीची पाहणी केली. पुराच्या पाण्यामुळे लोकांच्या अन्नधांन्याची नासाडी झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना धीर दिला. गरजू कुटुंबांना तूरडाळ,चणे, वाटाणे, साखर,चहा पावडर, तेल पिशवी, मेणबत्ती, बिस्कीट इत्यादी साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, अतुल बंगे, बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, कृष्णा धुरी, स्वप्नील शिंदे, बाळू पालव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page