बांदा /-

लाॉकडाऊन कालावधीत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहार जनजागृती व्हावी व कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार सेवन करावा यासाठी डॉ. अनिल नेरूरकर M. D. (अमेरिका) पुरस्कृत तंबाखू प्रतिबंध अभियान तेळेरे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेत बांदा नं. १ केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले.
आॉनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या लहानगटात बांदा केंद्र शाळेसह जिल्हाभरातून बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये बांदा केंद्र शाळेतील पूर्वा हेमंत मोर्ये हिने द्वितीय तर समर्थ सागर पाटील याने तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याचबरोबर गौरांग सहदेव देसाई याची उत्कृष्ट रंगसंगती मध्ये तर सानवी शैलेश महाजन हिची उत्कृष्ट तंबाखूमुक्ती जनजागृती घोषवाक्य म्हणून निवड करण्यात आली. याचबरोबर या स्पर्धेत शाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर,हेमांगी हेमंत दाभोळकर , शुभ्रा दत्तगुरू म्हाडगुत, तनया हेमंत दाभोळकर तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गेले वर्षभरापासून अधिक काळ शाळा बंद असतानाही बांदा केंद्र शाळेचे विद्यार्थी विविध संस्था व मंडळ यांनी आयोजित केलेल्या आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढवत असल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान केंद्रप्रमुख संदिप गवस व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page