कुडाळ /-

लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा शपथविधी समारंभ covid-19 चे सर्व नियम पाळून अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सुरुवातीला लायन परिवारातील सदस्य लायन देवेंद्र पडते व प्रांतपाल लायन रवींद्र देशपांडे यांच्या दुखःद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून ईशस्तवन सादर करण्यात आले. या शपथविधी सोहळ्यासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणचे सदस्य लायन श्री गणेश प्रभुलकर यांनी शपथप्रदान अधिकारी म्हणून काम पाहिले. ला.अस्मिता बांदेकर यांना अध्यक्ष पदाची, ला. सीए जयंती कुलकर्णी यांना सचिव पदाची व ला. आनंद बांदिवडेकर यांना खजिनदार पदाची शपथ दिली. अतिशय सुंदर व नेटकेपणे सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्य सांगून तसेच काही छोट्या गोष्टींमधून सकारात्मक कसे राहावे हे सांगून शपथविधी कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी व्यासपीठावर मावळत्या अध्यक्षा लायन नयन भणगे, सचिव सीए सागर तेली आणि खजिनदार श्रद्धा खानोलकर तसेच झोन चेअरमन स्नेहांकिता माने व नवीन झोन चेअरमन अशोक देसाई उपस्थित होते. यावेळी नवीन सदस्य सुहास परब, संतोष वारखंडकर, सुरज भोगटे, स्वरमयी सामंत यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. नवीन सदस्यांना शपथ देताना लायन्स क्लबमध्ये असण्याचे किती फायदे आहेत आणि तोटे काहीच नाहीत असे सांगून त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांची अतिशय सुंदर व मार्मिक शब्दात माहिती दिली. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या लायन्स सदस्यांच्या मुलामुलींचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यात श्रीशा मिलिंद बांदिवडेकर दहावी 96.20%, माया चंद्रशेखर पुनाळेकर 81.20%, श्रिनिज बांदिवडेकर ब्रेन डेव्हलपमेंट 92% आणि स्वरमयी नंदन सामंत बी टेक डिस्टिंक्शन व पुढील शिक्षणासाठी फ्रान्समध्ये.

या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ मालवण आणि लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांचे सभासद व
अॅड. अजित भणगे, अॅड. मिहिर भणगे, नयन भणगे, अॅड. वैद्य, अॅड. समीर कुलकर्णी, सी. ए. सुनील सौदागर, डाॅ. नंदन सामंत, डाॅ. श्रृती सामंत, स्वरमई सामंत, दिनार शिरसाट, श्रीनिवास नाईक, स्नेहा नाईक, मंदार शिरसाट, प्रकाश नेरूरकर, काका कुडाळकर, सागर तेली, श्रध्दा खानोलकर, जयंती कुलकर्णी, मेघा सुकी, मनोहर कामत, वैभव सावंत, वारखणकर, भोगटे, परब, मिलिंद बांदिवडेकर, जीवन बांदेकर, देविका बांदेकर,डाॅ. चुबे, अॅड. अमोल सामंत, अनंत शिंदे, संजू प्रभू, गौरव घुर्ये, मंजुनाथ फडके, अनुप तेली, जी. दत्ताराम, गणेश म्हडदळकर, शैलेश मुंडये, अस्मिता बांदेकर उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page