कुडाळ /-

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मंजूर निधीच्या पत्रांचे वितरण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराने कुडाळ तालुक्यातील तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी शासन निकषानुसार देय रक्कम रु १ कोटी ७१ लाख निधी मंजूर केला आहे. यामध्ये नुकसान भरपाईच्या एस.डी.आर.एफ. दराने ८६ लाख ३१ हजार व वाढीव दराने ८४ लाख ७४ हजार रु निधी देण्यात आला आहे. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना कुडाळ तहसील कार्यालय येथे नुकसान भरपाई निधी मंजूर झाल्याची पत्रे प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आली. यामध्ये तुळसुली येथिल जयश्री तुळसुलकर, व राजन तुळसुलकर यांच्या घरावर झाड पडून दोन्ही घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली होती. त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दीड लाख रु. नुकसान भरपाई मंजूर झाली असून निधी मंजुरीचे पत्र आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. त्याचबरोबर गोंधळपूर येथील महादेव पार्सेकर, पिंगुळी येथील दिवाकर धुरी, अर्जुन आगलावे, गुढीपुर येथील रिद्धी धुरी, ऋषिकेश सावंत, महादेव सावंत, शैलेश सावंत यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी मंजुरीची पत्रे वितरित करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी आमच्या नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला आर्थिक मदत देखील केली. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले होते.त्यानुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आतापर्यंत केव्हाही न मिळालेली नुकसान भरपाई आम्हाला अगदी जलद गतीने मिळाली आहे असे नुकसानग्रस्त नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी नायब तहसीलदार श्री. दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, विजय वारंग आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page