ब्युरो न्यूज /-

▪️ भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांच्या पुढे, आत्तापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू;
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

▪️ ‘सीरम’च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच; १४ ठिकाणी १५०० उमेदवार; ‘आयसीएमआर’ची माहिती

▪️ भारताचा भूप्रदेश पाकिस्तानचा भाग असल्याचे दर्शविणाऱ्या खोटय़ा नकाशाचा पाकिस्तानने वापर केल्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) परिषदेतून भारताचा सभात्याग

▪️ कांदा निर्यातबंदीच्या फेरविचाराचे संकेत; नाशिक जिल्ह्य़ामध्ये दर क्विंटलला ६०० ते ८०० रुपयांनी गडगडले

▪️ बुकर पुरस्काराच्या लघुयादीत अवनी दोशी; भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश

▪️ संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड; चीनचा मानहानीकारक पराभव; निम्मी मतेही नाहीत

▪️ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनच्या वस्तूंवर एकूण २०० अब्ज डॉलरहून अधिक कर लावणे हे बेकायदेशीर : जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)

▪️ थॉमस आणि उबर चषक लांबणीवर! मातब्बर संघांनी माघार घेतल्याने जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) घेतला निर्णय

▪️ “मोठं होऊन मला तुमच्यासारखं व्हायचंय”; सोनम कपूरने जया बच्चन यांना दिला पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page