वेंगुर्ले /-

समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण असल्याने सुरुची झाडे उन्मळून पडत आहेत.सध्या सर्वत्र पाऊस धो-धो कोसळत असल्याने समुद्राला मोठ्याप्रमाणात उधाण आलेले आहे. शिरोडा समुद्रकिनारी बंधारा बांधलेला असल्याने त्या परिसरात मोठा अनर्थ टळला असून किनार्‍यावरील उर्वरित भागात समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने किनाऱ्यावरील सुरुची झाडे उन्मळून पडत आहेत. शिरोडा समुद्र किनाऱ्याला बंधारा बांधणे आवश्यक आहे . तसेच या किनार्यावरील लाईट चे खांब सुद्धा कोसळून ते समुद्रात वाहून गेलेले आहेत शिरोडा ग्रामपंचायतीतर्फे गजीबो आणि सिमेंटचे बेंच पर्यटकांना बसण्यासाठी ठेवले असता त्याची पूर्ण नासाडी झालेली आहे. या वेळेला समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळत असल्याने त्याचा फटका किनाऱ्यावरील लोकांना बसत आहे. शिरोडा समुद्रकिनारी सर्वे नंबर 39 मध्ये सुरूच्या झाडांचे मोठे बन असून समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील झाडे उन्मळून मोठ्या प्रमाणात पडत असल्याने चिंतेचा विषय आहे. किनाऱ्यावरील लाईट चे खांब कोसळून वाहून गेल्याने समुद्रकिनारी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page