बांदा /-

आज !१२ जुलै.साहित्य संपदा आयोजित महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून संस्कारसंपदा नियोजित श्लोक पठण स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१शाळेच्या युक्ती युवराज राठोड हिने प्रथम तर युग्धा दिपक बांदेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करुन शाळेच्या सुयशाची परंपरा कायम राखली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याचे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व पाठांतर कौशल्य वाढावे या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. १०ते १३वयोगटात शुभंकरोती तसेच श्लोक व त्यांचा अर्थ सांगणे अपेक्षित होते या वयोगटात प्रथम व द्वितीय क्रमांक बांदा नं १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.या यशस्वी व स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदिप गवस यांनी अभिनंदन केले आहे. गेले वर्षभरातून अधिक काळ शाळा बंद असतानाही बांदा केंद्र शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन शाळेचा नावलौकिक वाढवत असल्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page