वेंगुर्ला /-

वेंगुर्ले मध्ये भाजपा ने पुन्हा एकदा शिवसेनेला खिंडार पाडले . यापूर्वी सुद्धा युवा सेनेचे क्रियाशील प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता . वेंगुर्ले मध्ये मच्छिमार्केट च्या उद्घाटन प्रसंगी आलेले भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रविंद्र चव्हाण व युवकांचे प्रेरणास्थान आमदार नितेशजी राणे , जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख व जेष्ठ शिवसैनीक तुकाराम ऊर्फ छोटु कुबल , वेंगुर्ले महिला उपशहर प्रमुख सौ.वृंदा मोर्डेकर , शिरोडा ग्रामपंचायत सदस्या सौ. प्राची प्रकाश नाईक यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला . त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला.

शिवसेनेचे ” इनकमिंग ” म्हणता म्हणता भाजपा मध्ये ” इनकमिंग ” सुरु !!!

चारच दिवसापूर्वी शिवसेनेची सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या बैठकीत खासदार विनायक राऊत व माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जुना नवा वाद न करता एकदिलाने काम करुन शिवसेनेमध्ये ” इनकमिंग ” सुरु करा असे आवाहन केले होते . परंतु वेंगुर्ले तालुक्यात या उलट भाजपाने शिवसेना पदाधिकारी यांना भाजपा मध्ये घेऊन ” इनकमिंगची ” सुरवात केली . या प्रवेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना आमदार नितेशजी राणे म्हणाले की ही सुरवात आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच मुळ शिवसैनिक नाराज आहेत . कारण मुळ शिवसैनीक हे हिंदुत्ववादी आहेत व सध्या सुरु असलेल शिवसेनेचे काँग्रेसीकरण मुळ शिवसैनिकांना मान्य नाही . तसेच हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच काँग्रेस विचारसरणीला कडाडून विरोध केला , परंतु आता सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हे सच्च्या शिवसैनिकांना मान्य नसल्याने ते नाराज आहेत.

यावेळी आम.नितेशजी राणे साहेब यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यकारणीचे अभिनंदन केले .तसेच कोवीड काळात व तौक्ते चक्रिवादळग्रस्थांना केलेल्या मदत कार्याचे कौतुक केले . यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करुन भाजपा मध्ये सर्वांचा सन्मान केला जाईल असे अभिवचन दिले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जेष्ठ नेते राजु राऊळ , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनिष दळवी , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , तुळस सरपंच शंकर घारे , ता.चिटनीस जयंत मोंडकर , समीर कुडाळकर , नितीन चव्हाण ,समीर चिंदरकर .ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस व निलेश सामंत , युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर , शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ , शिरोडा उपसरपंच राहुल गावडे , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे , महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , माजी चेअरमन प्रकाश राणे , शिरोडा शहर अध्यक्ष संदीप धानजी , हसीना बेन मकानदार , ग्रा.प. सदस्या सम्रुद्धी धानजी व वेदीका शेटये , संतोष शेटकर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page