सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३९ हजार ६२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार १ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.