कुडाळ /-

मुंबई-गोवा महामार्ग हा सिंधुदुर्ग मधून गोवा राज्याला जोडला जाणार आहे. कोकणवासीयांच्या व पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याबाबत त्याच्या कामाबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून निकृष्ट कामाबाबत बातम्या आल्या, राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी आंदोलने छेडली. अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आज हायवे अॅथोरिटी टोल सुरू करण्याच्या घाईगडबडीत आहे.परंतु हायवेच्या खचलेल्या भागाविषयी, बॉक्स वेलच्या चुकीच्या बांधकामाविषयी, कोसळलेल्या ब्रीच विषयी, चुकीचे कट /सर्कल विषयी, चुकीच्या डायग्रॅम विषयी कंपनी ठेकेदार गप्प आहेत. जनतेच्या पैशाच्या चुराड्यातुन होणार्या प्रकल्पाबाबत आमदार-खासदार तोंड उघडत नाहीत. अशा अनेक जनतेच्या तक्रारीवर माननीय राज साहेबांच्या आदेशाने पक्षाच्या रस्ते – साधन सुविधा व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष श्री. योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी व इतर पदाधिकारी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला… या प्रसंगी लोकांच्या समस्या व कामातील त्रुटी याच्या नोंदी घेतल्या गेल्या, भविष्यात माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या सर्व बाबींविषयी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे योगेश चिले म्हणाले.. गेली दोन दिवस पनवेल ते झाराप दरम्यान सुरु असणाऱ्या पाहणी दौऱ्याची सांगता झाराप येथे केली गेली. कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष धीरज परब ,दया मिस्त्री, बनी नाडकर्णी, जगन्नाथ गावडे ,रामा नाईक ,सुबोध परब, प्रथमेश धुरी, सिध्दांत बांदेकर, आदिलशहा, विष्णू मस्के, राहील शहा आदींनी दौऱ्यातील पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. व पहाणी दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page