मालवण /-

▪️ टेंडर मिळाली नाही की मालवण पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई चलबिचल होतात आणि षडयंत्र‌ रचतात- उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर.

30 जून रोजी झालेल्या पंचायत समिती मासिक बैठकीत वडाचापाट नूतन इमारत ग्रामपंचायत मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तर सुनील घाडीगावकर यांनी पूर्ण माहिती प्रशासनाकडून घ्यावी व त्यानंतर चालू असलेल्या इमारतीच्या जागेबाबत टीका करावी. तसेच श्री राजेंद्र प्रभूदेसाई यांच्याकडे पंधरा वर्षे सत्ता होती. तेव्हा स्वमालकीची जागा असताना सुद्धा बक्षीस पत्राने का करून घेतली नाही. तरीसुद्धा 2017- 18 पासून मासिक सभा व ग्रामसभेमध्ये राजेंद्र प्रभूदेसाई यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली तरी सुद्धा कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळला नाही .चालू असलेल्या इमारतीचे प्रशासकीय मान्यतेने टेंडर लागले असता कागदपत्राची माहिती असताना तसेच, विरोध असताना सुद्धा टेंडर कसे काय भरले?टेंडर मिळाले‌ नाही की राजेंद्र प्रभुदेसाई हे चलबिचल होतात व षडयंत्र करतात.त्यामुळे स्वतः चाळीस वर्षे इमारत बांधू शकले नाही ते काम आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करतोय. त्यामुळे टेंडर मिळाले नाही म्हणून सत्ता असलेल्या मालवण पंचायत समिती मध्ये फक्त दबाव आणायचा व षडयंत्र रचायचे हेच काम राजेंद्र प्रभूदेसाई करतात. त्यामुळे किती प्रयत्न केलात तरी योग्य रीतीने ग्रामपंचायत इमारत काम चालू असलेल्या जागेत योग्य रीतीने पूर्ण होईल .तसेच २०१७पूर्वी झालेल्या वडाचा पाट मधील विकास कामांची प्रशासनाने चौकशी करून किती कागदपत्र खरेखोटे आहेत त्याची शहानिशा करावी. अशी माहिती शिवसेना विभाग समन्वयक तथा उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page