सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांचा यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कामासाठी 218 कोटी एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.खासदार विनायक राऊत साहेब यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH 66) वरील अनेक प्रलंबित कामांना मंजुरी मिळून निधी मिळावा यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी व संबंधित मंत्रालयाचे सेक्रेटरी यांच्याकडे वेळोवेळी यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन सन 2021- 22 अंतर्गत एकूण 218 कोटी रूपये एवढ्या किंमतीच्या खालील प्रमाणे कामांना मिळाली मंजुरी.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग(NH66) चौपदरीकरण कामाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप दरम्यान प्रलंबित असलेली पुनर्वसन व श्रेणीवाढ कामे करणे. (25 कोटी)
2.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी 470/00 बांदा- सावंतवाडी येथे अंडरपास बांधकाम करणे. (20 कोटी,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी 468/500 ते 469/100 बांदा येथे फ्लायओव्हरचे बांधकाम करणे. (80 कोटी,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी 451/300 ते 451/900 नेमळे येथे ओव्हरपासचे बांधकाम करणे. (20 कोटी,5.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे किमी 51/800 येथे अंडरपासचे बांधकाम करणे. (20 कोटी)

6.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी 406/070 येथील जानवली येथे सर्व्हिस रोडसाठी दोन पदरी मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. (50 कोटी)
7.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग(NH66) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी 450/17 ते 471/30 झाराप ते पत्रादेवी दरम्यान मध्यभागामध्ये सुपीक माती भराव करून प्लांटेशन करणे,रंगरंगोटी इ. सुरक्षाविषयक उपाययोजना करणे. (3 कोटी)
माननीय खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांनी आपल्या लोकसभा मतदार संघामध्ये सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्याचा योग्य रीतीने पाठपुरावा केल्यामुळेच आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH66) मार्गावरील अनेक प्रलंबित कामांना संबंधित मंत्रालयाने आपल्या वार्षिक नियोजन मध्ये समाविष्ट करून त्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामातील लोकांच्या समस्या व मागण्या पूर्ण होऊन सदर कामातील अडथळे दूर होणार आहेत.
अजूनही काही अधिग्रहण व पुनर्वसन संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत,त्यांचा सुद्धा योग्य पाठपुरावा चालू आहे,ते सर्व नजीकच्या काळामध्ये मंजूर होतील असा विश्वास खासदाफ विनायक राऊत साहेब यांनी। व्यक्त केला आहे.अशा प्रकारे वेळोवेळी केलेल्या विनंतीस मान देऊन केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी यांनी भरघोस अशा प्रकारचा निधी या लोकसभा मतदार संघासाठी मंजूर केल्याबद्दल खासदार मा.श्री. विनायकजी राऊत साहेब यांनी मा.ना.श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे आभार मानले आहेत.अशी माहिती जी प सदस्य तथा गट नेते नागेंद्र परब यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page