सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार शासकीय ठेकेदारांना जास्तीत-जास्त कामे द्या,अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी यांनी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. आज याबाबत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली.या निवेदनाद्वारे १०लक्ष किंमतीच्या आतील कामे लॉटरी पद्धतीने ३३:३३:३४ गुणोत्तराप्रमाणे समान वाटप व्हावे. तसेच चुकीच्या पद्धतीने आर्थिक क्षमता, ताळेबंद दाखला आयकर प्रमाणपत्र, जिसटी भरणा करत असल्याबाबतचे दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र असल्याशिवाय ग्रामपंचायतला कामे देण्यात येऊ नये. विहित मुदतीत ठेकेदाराच्या देयाकामधून वजा करण्यात आलेली जिसटी व आयकर याची रक्कम अनेक ग्रामपंचायत भरणा करत नसल्याबाबत निदर्शनास आलेले आहे त्यामुळे ठेकेदारांचे नुकसान होत आहे त्यामुळे योग्य कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले. यावेळी साहेबांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच कामांचा निधी 100% खर्च करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सुचीत केले तसेच आपल्या स्तरावर सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासनं दिले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा. उदयजी पाटील,जिल्हाध्यक्ष सागर भोगटे, उपाध्यक्ष हर्षवर्धन कदम, सचिव संजय चोडणकर, जिल्हा सदस्य
व्यंकटेश सावंत,शुभम वैद्य, कुडाळ तालूकाध्यक्ष ओंकार वाळके, प्रसाद पाटकर वेंगुर्ला उपाध्यक्ष बालकृष्ण परुळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page