कुडाळ /-

स्त्रियांची वटपोर्णिमा संपूर्ण भारत वर्षात हिंदू संस्कृती मध्ये साजरी केली जाते वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असतात .यावरून स्फूर्ती घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व डॉक्टर संजय निगुडकर व त्यांच्या सहकार्यांतर्फे 2009 पासून कुडाळ येथे पुरुषशाची वटपौर्णिमा साजरी केली जाते.वटवृक्षाला सात फेरे मारून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी. अशा प्रकारची अपेक्षा व प्रार्थना करत होते. यशस्वी पुरुषाच्या मागे समर्थ स्त्रीचा हात असतो. ती समर्थपणे कुटुंब, संसार सांभाळते म्हणून पुरुषांना आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होता येतं , अशी स्त्री, तिचं सहकार्य तिची साथ जन्मी जन्मोजन्मी मिळत राहावी अशा प्रकारची अपेक्षा या उपक्रमातून देणे हा उद्देश आहे . हा उप्रकम स्त्री-पुरुष समानतेचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे .स्त्री प्रती असलेला आदर अशा प्रकारच्या उपक्रमातून व्यक्त करताना स्त्री पुरुष समानतेचा एक आगळा वेगळा आदर्श पुरुषांच्या या वटपौर्णिमेच्या निमित्ताने समाजासमोर ठेवलेला आहे.या उपक्रमाला समाजातील विविध स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. धो-धो पाऊस पडत असताना सुद्धा गेली बारा वर्ष चालू असलेली ही पुरुषांची वटपौर्णिमा या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने कुडाळ येथे साजरी करण्यात आली.उमेश गाळवणकर, डॉक्टर संजय निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आलेली पुरुषांची वटपौर्णिमा यामध्ये प्रा.अरुण मर्गज. प्रा. परेश धावडे प्रा. नितीन बांबर्डेकर ,श्री सिद्धेश गाळवणकर ,प्रसाद कानडे ,किरण सावंत ,सुनिल गोसावी, संतोष पडते ,सुरेश वरक व इतर क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. .. वटवृक्षाला सात फेऱ्या मारून सात जन्मी,जन्मोजन्मी आपल्याला आपल्या सुविद्य पत्नीची साथ मिळावी अशा प्रकारचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.तिच्यासाठी निरोगी व दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page