कुडाळ /-

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज वरवडेच्या विद्यार्थ्यांनी योग दिन केला उत्साहात साजरा "योग केल्याने आपण ताजेतवाने राहुन बौद्धिक क्षमता वाढते. मनाची एकाग्रता वाढते.आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. योग केल्याने आपण आनंदी राहतो आणि आजारी प़डत नाही. योगामुळे स्मरणशक्ती वाढुन तुम्हाला चांगल्या सवयी लागतात. अभ्यासाची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. उदासीनता घालवण्यासाठी मदत होते," असे प्रतिपादन योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे पळसुले यांनी विद्यार्थ्यांना केले. जागतिक योग दिनानिमित्त ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वरवडे मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने व त्यांचे महत्त्व शिकवून जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ.विद्याधर तायशेट्ये, उपाध्यक्ष मोहन सावंत, सेक्रेटरी हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, उपसचिव निलेश महेंद्रेकर, सिईओ तानवडे सर, खजिनदार सौ.शितल सावंत, मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना बहुमुल्य असे योग मार्गदर्शन केल्याबद्दल सौ.श्वेता गावडे यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page