कुडाळ /-


कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्ड मधील डांबरीकरणाचे काम आमदार निधीतून करावे अशी मागणी मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष जेडी उर्फ बनी नाडकर्णी यांनी आज बुधवारी कुडाळ येथे केली आहे.सध्या करोनाच्या भयाण परिस्थितीमुळे एसटीचा व्यवसाय डबघाईला आला असून ,त्यामुळे कुडाळ एसटी स्टँड मधील काम अर्धवट पडून राहिले आहे.पावसाळ्यामध्ये अक्षरशा त्या ठिकाणची जागा ही चिखलमय स्वरूपात झालेली आहे प्रशासनाकडे वारंवार लेखी तसं तोंडी स्वरूपात सान्गुन्सुद्धा एसटी प्रशासन हतबल झालेले आहे ,त्यामुळे सदर काम हे स्थानिक आमदाराच्या निधीमधून करून घ्यावे असे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी आहे.व लवकरात लवकर ते काम न झाल्यास सदर काम हे विरोधी पक्षाच्या आमदाराच्या निधीमधून करून घ्यायची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना च्या वतीने ,एक लेखी स्वरूपाचे निवेदन दुसऱ्या विरोधी पक्षाच्या आमदाराला देण्यात येईल व त्यासंदर्भातले पत्र हे माननीय श्री हरी माळी साहेब त्यांच्या आदेशाने देण्यात येणार आहे.असे कुडाळ येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना मनसेचे जेडी उर्फ बनी नाडकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page