कणकवली /-

चिपी येथील नियोजित विमानतळाला संसदपटू बँ नाथ पै यांचे नाव द्यावे, अशी मागणी कोकणवासियांकडून होत आहे, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी केली आहे.
एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
बँ नाथ पै यांनी राजापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणुन प्रतिनिधीत्व करताना संसदेत अभ्यासपूर्वक आवाज उठविला होता. म्हणूनच आज कोकणातील अनेक संस्थांनी, शाळा-महाविद्यालयांनी, वाचनालयांनी आदरपुर्वक त्यांचे नाव दिले आहे. मात्र त्यांचे उचित असे भव्य स्मारक कोकणभूमीत उभारण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही अशी खंत व्यक्त करुन केळुसकर म्हणाले, नवी मुंबईतील विमानतळाला दिव्यंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन करण्यात आले. त्यामुळेच कोकणवासियांनी चिपी येथील विमानतळाला बँ नाथ पै यांचेच नाव देण्यासाठी चळवळ सुरू केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या चळवळीचे नेत्तुत्व आम्ही करावे अशी मागणी केली आहे. त्यांचा मान राखून आम्ही या चळवळीत सक्रिय झालो आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page