कुडाळमधील रिक्षा चालक व रिक्षा युनियन सेक्रेटरी विजय कांबळी यांनी व्यक्त केली नाराजी.

कुडाळ /-

रिक्षा चालक मालक यांना लॉकडाऊन काळात दिलेला पंधराशे रुपये मदत निधी ही मदत नसून त्यांच्या परिस्थितीची आणि जगण्याच्या संघर्षाची अक्षरशः उडवलेली थट्टा आहे. शासनाचा याबद्दल मी निषेध करतो, असे कुडाळमधील रिक्षाचालक विजय कांबळी यांनी म्हंटले आहे.विजय कांबळी यांनी म्हंटले आहे की एक रीक्षा चालक म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपणही आता या विषयावर आपली नाराजी आता तीव्रपणे शासनाकडे व्यक्त केली पाहिजे.

आम्हा रीक्षा चालक मालक यांना लॉकडाऊनमधल्या उदरनिर्वाहासाठी पंधराशे रुपये देऊ केले आहेत. ही या व्यवसायाची आणि व्यावसायिकांची क्रूर थट्टा आहे. त्याचा मी निषेध करतो. मुळातच, शासन आमच्याकड्डन प्रतिवर्षं टॅक्सेसच्या स्वरूपात किमान १४ ते १५ हजार रुपये सरकार दरबारी भरून घेते. यात आम्हाला कसलीही सूट, सवलत वा कसलाही परतावा नाही. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील आर्थिक मंदी आणि संकटांमुळे आम्हा रीक्षाचालकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यातच आमचे अनेक सहकारी कारोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुंटुबीयाना शासनाची कृठलीही भरीव मदत नाही आमचा जीव धोक्यात घालुन जनतेच्या गरजेसाठी वसाठी आम्ही आमचा व्यवसाय चालवित आहोत. शासनाने कायमच रिक्षाचालक वर्गाला उपेक्षित ठेवले आहे. प्रत्येक बाबतीत आपल्यावर कायमचा अन्याय केला आहे.

याविरोधात आपण जर संघटीत नाही झालो तर कुठलेही सरकार आपल्याला न्याय देणार नाही. आपण कायम आपल्या हक्कासाठी वंचित राहाणार. जिल्हा रिक्षा संघटनेचा युनियन सेक्रेटरी म्हणून मी शासनाच्या या वर्तणुकीचा निषेध म्हणून मी ही शासनाची तथाकथित मदत न स्वीकारता शासनाला परत करत आहे.आपली मागणी असेल की ही तुटपुंजी मदत न देता आम्हा सर्व रीक्षा चालक मालक यांना पेन्शन ची व्यवस्था करावी. जे रिक्षाचालक कोरोना काळात रिक्षा सेवा करताना मुत्युमुखी पडले आहेत, त्यांना शासनाने भरीव मदत करावी. कोणाच्याही खोट्या उपकाराच्या ओझ्याखाली न अडकता भविष्यात संघटनात्मक ताकद वाढवून आपण आपल्या हक्काच्या पुर्ततेसाठी एकसंघ ताकद वापरूया, असे आवाहन विजय कांबळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page