मसुरे /-

मसुरे कावावाडी येथे साबाजी हडकर यांच्या घरा नजीक गतवर्षी पावसाळ्यात खचलेल्या नदी किनाऱ्याची खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी पाहणी करत खारलँड विभागाला धुपप्रतिबंधक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव करण्याचे आदेश दिले. तसेच निधीची तरतूद तातडीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी मसुरे खोतजूवा बेट धुपप्रतिबंधक बंधारा व खाजणवाडी- चांदेर येथील धुपप्रतिबंधक बंधारा तातडीने करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, सुहास पेडणेकर, पपु मुळीक व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मसुरे कावावाडी येथील साबाजी हडकर यांच्या घरानजीक गतवर्षी रमाई नदीच्या प्रवाहामुळे जमीन खचली होती. त्यामुळे घरापुढील तुळशीचे वृंदावन सुद्धा खचले होते. व साबाजी हडकर यांच्या घराला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधींनी खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. तसेच खाजणवाडी येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती खाऱ्या पाण्यामुळे नापीक बनली आहे त्यामुळे याभागात खारलँड बंधारा होण्या बाबत सुद्धा लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत तातडीने प्रस्ताव बनविण्याचे आदेश खासदार विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page