मालवण /-

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि निलक्रांती सहकारी संस्थेचा
संयुक्त उपक्रम असलेल्या ,समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC),कांदळगाव,मालवण येथे मा.जिल्हाधिकारी श्रीमती.के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.यावेळी मा.तहसीलदार श्री.पाटणे,प्रांताधिकारी श्रीमती. खरमाळे,मालवण,मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी पाटील,मालवण नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री.जावडेकर,मालवण नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर,नगरसेवक श्री.नितीन वाळके,कांदळगाव सरपंच सौ. उमेदी परब व ईतर ग्रामपंचायत सदस्य,डॉ.मालविका झांट्ये तसेच आरोग्य क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर व निलक्रांती सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मा.जिल्हाधिकारी यांनी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि निलक्रांती सहकारी संस्थेचा
संयुक्त उपक्रम असलेल्या ,समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC) ला शुभेच्छा दिल्या आणि रेडकर हॉस्पिटल ने घेतलेल्या पुढाकार बद्दल जिल्हा आणि महाराष्ट्र शासन तर्फे आभार मानले.रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर चे अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील अश्या प्रकारचे हे कोकण मधील हे पहिलेच केंद्र असल्याचे सांगितले तसेच असे केंद्र प्रत्येक तालुक्यात उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.DCHC मधील
उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे,टेली मेडिसिन तसेच ईतर सोयी सुविधा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काही राखीव जागा ठेवण्याचे आश्वासन दिले.कांदळगाव ग्रामपंचायत यांनी घेतलेला
पुढाकार आणि सहकार्य याचा उल्लेख प्रामुख्याने केला. मा.मुख्याधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.

सदर उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे कोरोना बाधित होऊन कोरोना मुक्त झालेल्या वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तींनी सुरू केलेले हे पहिलेच केंद्र आहे. सदर केंद्र तर्फे सेवा सुविधा सुरू केल्या असून (०२३६५/२५२११५)या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सदर उपक्रमामुळे जिल्हा प्रशासन वरील ताण कमी होणार असून,जिल्हा वासियांना अत्याधुनिक सेवा तज्ञ मार्गदर्शनाखाली उपलब्ध होणार आहे.अकलूज येथील प्रख्यात तज्ञ डॉ. श्री. ईनामदार टेली मेडीसिन द्वारे तर मालवण येथील हृदयरोगतजज्ञ डॉ.मालविका झाट्ये ,डॉ.रामचंद्र चव्हाण,अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.क्षिरसागर,रेडकर हॉस्पिटल चे वैद्यकिय अधिकारी डॉ.दर्शन खानोलकर,आहार तज्ञ डॉ.गार्गी ओरस्कर,डॉ.शुभांगी जोशी तसेच ईतर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
निलक्रांती सहकारी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page