कणकवली /-

युनिसेफने दखल घेतलेल्या नितांत राजन चव्हाण याचे कनक रायडर्स परिवारातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी सत्कार 12 जून रोजी वरवडे संगम येथे करण्यात आला. यानिमित्ताने नितांत व त्याच्या परिवाराचा कनक रायडर्स तर्फे वटवृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कणकवली शहरातील कनक रायडर्सचा सायकलपटू कु. नितांत राजन चव्हाण याच्या सायकलिंगमधून पर्यावरण संवर्धन संदेशाची दखल मुलांसाठी काम करणारी जागतिक संघटना असणाऱ्या युनिसेफने घेतली असून ‘हिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश स्वकृतीने देणाऱ्या नितांत वरील विशेष लेखाचा समावेश चरखा युनिसेफ या प्रकल्पाच्या वेबसाईटवर जागतिक पर्यावरण दिनी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी कनक रायडर्स चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, योगेश महाडिक, संजय बिडये, यशवंत भोसले, संतोष कांबळे, आर्यन कांबळे, तेजस चव्हाण, चंद्रशेखर धानाजी, उज्वला धानजी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page