कणकवली /-

वर्षा पर्यटनासाठी निसर्गरम्य कणकवली तालुक्यातील सावडाव धाबधब्यावर पर्यटक गर्दी करतात मात्र गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणार मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.   गेली आठ वर्षे वर्षा पर्यटनासाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून राज्यासह ईतर राज्यातील पर्यटकांना सावडाव धबधब्याने भूरळ घतल्यानतंर पर्यटक गर्दी करत असून गरतवर्षी कोरानाचे सावट असल्याने धबाधबा बंद असल्याने गर्दी दिसली नाही. मात्र गेले एक वर्षे सोडले तर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे दिसून येत होते. यावर्षी अजून मान्सून पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे  सावडाव धबधबा प्रवाहित झालेला दिसत नाही.मात्र येत्या काही दिवसांत दमदार पावसाने हजेरी लावल्यानतंर धबधबा प्रवाहीत होणार आहे.तत्पूर्वी स्थानिक प्रशासन नेहमीच वर्षा पर्यटकांच्या स्वागतासाठी कायमच सज्ज झालेले दिसून येते. त्याचबरोबर पर्यटकांची गैरसोय होणार नाही यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत काळजी घेताना दिसायचे.  जिल्हात कोरानाचे संकट लक्षात घेता तसेच जगावर आलेल्या या महामारीमुळे यावर्षी सावडाव धबधबा कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरीक व पर्यटकाचे आरोग्याची काळजी लक्षात घेऊन तसेच राज्य,ईतर राज्य व जिल्ह्यातील अनेक भागातून दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी  पाहता गतवर्षी प्रमाणे यावर्षी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मार्ग बंदही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत अहे. दरवर्षी हजारो पर्यटक सावडाव धबधब्यावर येत वर्षा पर्यटनांचा आनंद घेत असतात. मात्र यंदाही कोरोना संकटामुळे त्याच्या आनंदावर विरजण पडणार असून याचा फटका येथील रोजगार मिळालेल्या व्यावसायिकांना बसणार असून त्याचे आर्थिक नुकसान  होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला मिळणारा अभ्यंगत पर्यटन करालाही मुकावे लागणार आहे.  कोरोनारूपी महामारीत जिल्हात थैमान घालत असल्याने पर्यटकांनी आपल्यासह कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. कारोना प्रादुर्भावाच्या काळात आपण सर्वांनी घरीच राहावे. तसेच वर्षा पर्यटनांसाठी नागरीकांनी जीव धोक्यात घालून येवू नये असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे.  सध्याची परिस्थिती पाहता जिल्हात कोरोनो रूग्णसंख्या जास्त आहे.त्याच अनुशंगाने विचार करता सावडाव धबधबा पर्यटन स्थळ शासनाच्या नियमानुसार अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद ठेवत आहोत.पर्यटक मोठ्या संख्येने येत असता कोरोना प्रार्दुभावाचा विचार करता शासनाचा नियमावलीचा विचार करून गावाच्यावतीने बंद ठेवत आहोत असे सावडाव सरपंच अजय कदम यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page