मसुरे /-

कोरोना विषाणू (कोव्हिड – 19) संसर्गाचा वाढता पादुर्भाव विचारात घेता कोरोना विरुद्धच्या लढाईत नविन रणनिती वापरणे गरजेचे बनलेले आहे. यासाठीच डॉ.रेडकर रिसर्च सेंटर मालवण व निलक्रांती सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत हडीच्या ग्रामदक्षता समितीचे सदस्यांचे प्रशिक्षण ग्रामपंचायत हडीत घेण्यात आले. यामध्ये कोरोनापूर्व, कोरोना झालेला असताना व कोरोना झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मिथिलीन ब्ल्यु चा वापर कोरोनाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून प्रभावी असल्याच मत निलक्रांती संस्थेचे संस्थापक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत आहार तज्ञ डॉ.गार्गी ओरसकर यांनी कोरोना रुग्णांसाठी आहार, कोरोना पश्चात घ्यावयाच्या आहार याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मिथिलिन ब्ल्यु या औषधाविषयी माहिती, त्याचा वापर वैद्यकिय सल्ल्याने घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत निसर्गोपचार तज्ञ स्पेशालिस्ट नमिता चुरी यांनी सर्वांनी घ्यावयाची काळजी , प्राणायमचे महत्त्व व सतत सकारात्मक विचार करुन आनंदी राहण्याबाबत मार्गदर्शन केले. या बरोबरच डॉ. चेतन यांनी उपस्थित मेडिकल चेकअप केले. याप्रसंगी ग्रामदक्षता समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच श्री.महेश बाळकृष्ण मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page