आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉ.विवेक रेडकर यांची सकारात्मक चर्चा..

मुंबई /-

मालवणात साध्य कोवीड रुग्णावर मिथीलीन ब्ल्यू हे औषध उपयोगी ठरत आहे.त्यामुळे ऑक्सिजनची देखील बचत होत आहे,असे प्रेझेन्टेशन मालवणचे डॉ. विवेक रेडकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर केले. दरम्यान श्री. टोपे यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवत आपल्या सहकाऱ्यांना माहिती देऊन याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून डॉ. रेडकर यांची श्री. टोपे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मिथिलीन ब्ल्यू औषध कोवीड रुग्णांसाठी उपयोगात आणून रुग्णांना वाचविले, त्यामुळे हे औषध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णावर उपचार करण्यासाठी उपयोगात आणावे तसेच राज्यात वापरावे, असा आरोग्य मंत्री टोपे यांच्यासमोर आमदार केसरकर यांनी प्रस्ताव ठेवला होता. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉ. विवेक रेडकर यांच्यासह आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज वेळ देऊन मिथिलीन ब्ल्यू औषधाचे प्रेझेंटेशन पाहिले. डॉ. रेडकर यांनी मालवण येथील रुग्णावर उपचार केल्यानंतर मृत्यूचे प्रमाण घटले तसेच ऑक्सिजनची बचत झाली असे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page