आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा

मालवण /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून याठिकाणी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.त्याचप्रमाणे औषध पुरवठा तसेच कोविड स्थितीची माहिती घेण्यात आली ज्यांना लक्षणे आहेत त्यांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिरवंडे गावात १०० पेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडले असल्याने आ. वैभव नाईक यांनी शनिवारी शिरवंडे ग्रामपंचायत येथे भेट देऊन गावातील कोविड स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी कोविड रुग्णांसाठी औषधांची मागणी करण्यात आली होती त्यावर आ. वैभव नाईक यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांच्याशी संपर्क करत रुग्णांसाठी तातडीने आवश्यक औषध पुरवठा करण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार शिरवंडे येथे तातडीने औषध पुरवठा त्याचबरोबर इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. हिवाळे येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, सुपरवायझर आयनोडकर, स्टाफ नर्स नीलम ठाकूर, बंडू चव्हाण, युवानेते बाबा आंगणे, सरपंच अंबाजी सावंत, पुरुषोत्तम खेडेकर, असगणी सरपंच हेमंत पारकर, सचिन परब, पंकज वर्दम, बबन परब, गोट्या गावडे, आशुतोष सावंत, सुभाष धुरी, नितेश खेडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page