वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम.के.गावडे यांच्या हस्ते कल्पवृक्षची लागवड करुन जागतिक पर्यावरण
दिन साजरा करण्यात आला.यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले कि,पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळेच नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे कार्बन क्रेडिटची समस्या निर्माण होत आहे.झाडे लावा – झाडे जगवा ही फक्त घोषणा होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे घोषणा कागदावरच राहते. वास्तविक पाहता कोकण विभाग आंबा, काजू, कोकम, फणस इत्यादी झाडांची शेतकऱ्यांनकडून खाजगी स्वरूपात लागवड झाल्यामुळे कोकणाचा पश्चिम किनारा हिरवागार दिसतो.मात्र पूर्व भाग सह्याद्री पट्ट्यात त्या प्रमाणात लागवड होताना दिसत नाही. झाडांचा उपयोग फक्त फळे देण्यासाठी तर होतोच, मात्र त्याचबरोबर सेंद्रिय घटक वाढविण्यासाठी पालापाचोळ्याचा उपयोग होतो व मातीची होणारी धूप थांबविण्याचे काम झाडेच करतात. झाडाच्या पालापाचोळ्यातून गांढूळाची निर्मिती होते. ते गांढूळ पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत करतात. विकासाच्या नावाखाली आज बहुसंख्य घटकांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. त्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. उदाहरण म्हणून, मुंबई – गोव्याचे चौपदरीकरण करत असताना कोकणातील अनेक डोंगर टेकड्या नष्ट झाल्या. त्याचबरोबर तेथील झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेकेदाराने ४० लाख नवीन झाडे लावून देण्याचा करार केला. मात्र गेल्या ५ वर्षात १ ही झाड लावलेले दिसत नाही आणि प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. तसेच कोकणातील रस्त्यांचे सौंदर्यही नष्ट झालेले आहे. कोकणातील खाड्यांमधून दरवर्षी करोडो ब्रास अनधिकृत रेती काढली जाते आणि रेतीची विक्री परजिल्ह्यात – परराज्यात केली जाते. याचे अनेक दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतात. त्याचबरोबर नैसर्गिक जैवविविधताही नष्ट होते. शासनाचे आर्थिक अफाट नुकसान होते. माझ्या मते, महत्वाच्या आजच्या दिनी महसूल विभागाच्या या उद्योगामुळे कोकणाचे मात्र नुकसान होत आहे.निसर्गाची अनियमितता थांबवायची असेल, तर शेतकऱ्यांनी झाडे लावली पाहिजेत,शेती केली पाहिजे. गोधन वाढविले पाहिजे. तर आणि तरच पर्यावरण रक्षणाला मदत होईल.आपला कोकण प्रदेश भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या झाडांमुळे कितीतरी पटीने
ऑक्सिजन निर्मिती होत आहे. वास्तविक पाहता या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणे आवश्यक असून ऑक्सिजन निर्मितीच्या पटीत
पर / झाड अनुदान मिळाल्यास अजूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊ शकते. तसेच तसेच हा निधी जागतिक बँकेकडून पर्यावरणासाठी येणाऱ्या निधीतून वापरल्यास सरकार वर जास्त भार येणार नाही,असे यावेळी बोलताना कृषिभूषण, प्रगतशील शेतकरी वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन तथा सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी वेतोरे येथे केले.यावेळी विलास गावडे,बाळा कुबल,रविंद्र पंडित मोहन धर्णे, विजय मोहिते,जगदीश गावडे आदी शेतकरी उपस्थित होते.शेती बरोबरच गेली ४० वर्षे सहकार क्षेत्रात योगदान देणाऱ्या एम.के.गावडे यांनी वृक्षलागवड व पर्यावरण समतोल राखणाऱ्या सर्व घटकांचे महत्व अधोरेखित करणारे आहे,असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page