कुडाळ /-

पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोव्हिड 19 लस द्या त्यांची दर आठवड्याला रॅपिड टेस्ट का करता? असा सवाल शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब यांनी जि प अध्यक्ष्या संजना सावंत यांना करुन समाचार घेतला आहे,पुढे बोलताना श्री परब म्हणाले की,जे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना जमले नाही ते जिल्हा परिषदेने करुन दाखवले मूळात आपले अज्ञान प्रकट सौ.सावंत यांनी केले आहे कारण जे अधिकार मुळात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेला दीले त्यामुळेच तर हे सर्व शक्य होत आहेत.

खर तर पत्रकारांना फ्रंट वर सोयी सुविधा द्याव्यात या साठी मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत यांनी कायमच काळजी घेतली आहे त्यांना आमच्या पालकमंत्री ना उदय सामंत मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांच्या बद्दल मनात कलुषित पणा आणुन देण्या इतपत पत्रकार मित्र खुळे नाहीत त्यामुळे काही तरी मोठा काहीतरी पराक्रम करून दाखवला अश्या अविर्भावात जि प अध्यक्ष्या सौ संजना सावंत यांनी राहु नये राज्य सरकारने कोव्हिड लस दीले पर्यायाने मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांनी उपलब्ध करुन दीले फक्त जिल्हा परिषदेवर दीलेली जबाबदारी पार पडली एवढच काय ते काम केले. जिल्हा परिषद नारायण राणे ची की भाजपची असा सवाल श्री परब यांनी करुन जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर रुसुन बसले ते याच कारणासाठी काय? कोरोना महामारीच्या या संकटात टीका टीपणी करण्या पेक्षा समाजात सध्या ख-या अर्थाने निस्वार्थी वृत्तीने काम केले पाहिजे ज्या पध्दतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे काम करतात त्यांचा आदर्श घेऊन खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर ज्या पध्दतीने काम करतात त्या पध्दतीने काम करा असा सबुरीचा सल्ला देत परब म्हणाले पालकमंत्री ना उदय सामंत यांनी खनिकर्म मधून रुग्ण वाहीका दील्या त्यावेळी प्रोटोकॉल म्हणून जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांना आदराने सन्मान दीला होता त्यातही सौ सावंत यांनी राजकारण सुरू करून जणु आपणच रुग्णवाहिका दील्या असे फोटोसेशन केले हीच तुमची कटु निती असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य आणि कोव्हिड साठी झपाटुन काम करणारी शिवसेना जिल्ह्य़ातील गावा गावात झोकून देत काम करीत आहेत त्यामुळे इवलेसे केले आणि भले मोठे मोठे करुन दाखवले ही निती बंद करा असा सल्लाही नागेंद्र परब यांनी दीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page