वेंगुर्ले /-
वेंगुर्ले तालुक्यात २८ व २९ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ८,मातोंड ६,तुळस ३,आरवली ४,उभादांडा १,वेतोरे मिरमेवाडी ५,वेतोरे पालकरवाडी ३,आडेली ४,मठ १,अणसूर २,शिरोडा १,मोचेमाड १,आसोली १,पेंडूर २,म्हापण १ आणि वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती असे एकूण ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.दरम्यान २५ मे रोजी ३२ व्यक्ती व २६ व २७ मे रोजीच्या अहवालात ५० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page