भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अविनाश पराडकर यांच्या मागणीला यश..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांना आरटीओकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून केलेल्या मागणीनुसार आरटीओ कंट्रोल रूम सिंधुदुर्गात कार्यान्वित होत आहे. जिल्ह्यात रुग्णवाहिकांचे दरही निश्चित करण्यात आले असून त्यापुढे कडक अंमल बजावणीवर नजर ठेवण्याचे काम भाजपा कार्यकर्ते करणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.

ॲम्ब्युलन्स चालक विशाल जाधव याच्या गैरवर्तनानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया समाजात उठल्या होत्या. त्यानंतर विशाल जाधव याच्यावर गुन्हा दाखल व्हावाच, पण तो अंतिम उपाय नाही, तर ॲम्ब्युलन्सचे दर निश्चित करून तसे ॲम्ब्युलन्सच्या दर्शनी भागावर लावावे अशी मागणी भाजपाचे अविनाश पराडकर यांनी केली होती. विशाल जाधव हा एकमात्र नसून त्याच्या जातकुळीतले बरेच जण आजही जिल्ह्यात असल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका माफक दरात व वेळेवर मिळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका माफक दरात व वेळेवर मिळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात येत आहे. कंट्रोल रूम कडून नागरिकांना त्यांच्या नजीक असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती पुरवण्यात येणार आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २४ X ७ अशी ही कंट्रोल रूम कार्यान्वित राहणार आहे. कंट्रोल रूमचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२ – २२९०२० आणि मोबाईल क्रमांक ९३५९७८८३४४ असेल. ज्या नागरिकांना खाजगी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळच्या रुग्णवाहिका चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक देण्यात येईल. रुग्णवाहीकांचे भाडे निश्चित करण्यात आले असून मारुती व्हॅन साठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी ७५० रुपये व २५ किलोमीटर पेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर १४ रुपये असेल, तर टाटा सुमो मारुती इको, मॅटाडोर सदृश्य वाहनासाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी ९०० रुपये आणि २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर १४ रुपये, टाटा 407, स्वराज माझदा, टेम्पो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी १०००/- रुपये, पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर २० रुपये व आयसीयू वातानुकूलित वाहनासाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासाकरता १२००/- रुपये, २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये प्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या तुलनेत हे दर अधिक असले तरी वारेमाप लूटतरी थांबेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे व या निर्णयाचे स्वागतच आहे. पण याची अंमल बजावणी आणि तक्रारींचे निवारण यासाठी आरटीओचे वायूवेग पथकदेखील कार्यान्वित होण्याची गरज आहे, तसेच प्रत्येक वेळी वाहनाचे सॅनिटरायझेशन करणे, वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवणे यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. मात्र प्रशासनाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल नक्कीच आभार व अभिनंदन आहे असे अविनाश पराडकर म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page