वेंगुर्ला /-
तौक्ते चक्रीवादळाने संपूर्ण कोकण विशेषतः किनारपट्टी लगतची गावे उध्वस्त झाली. मच्छीमारांचे तसेच आंबा, काजू नारळीसह अनेक बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय नेत्यांनी याची दखल घेवून कोकणात भेटी देवून पाहणी केली.भरघोस मदत देण्याचे आश्वासन दिले. ही मदत आता लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे प्रतिनिधी जयप्रकाश चमणकर यांनी केली आहे.या वादळाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भरीव मदतीचे आश्रवासन दिले. या आश्वासनाची पुर्तता कधी होणार ? याकडे उध्वस्त कोकणी माणूस आतूरतेने वाट पाहत आहे. खरं म्हणजे गोवा, गुजरात च्या तुलनेत कोकण किनारपट्टीवर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये भेट देवून तात्काळ एक हजार कोटी नुकसान ग्रस्तासाठी मदत करतात. मात्र कोकणात भेटही देवू शकत नाहीत. मदतीचीही घोषणा नाही. हे कोकणचे दुदैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आंबा, काजू, नारळसह सर्वच बागायतीचे सरसकट नुकसान झालेले असल्याने सर्वच शेतकरी नुकसान ग्रस्त मदतीस पात्र आहेत. त्यामुळे तशी तरतूद करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page