देवगड /-

पंतप्रधान केवळ गुजरातला गेले अशी टीका करून शिवसेना व महाविकास आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र राज्यात चक्रीवादळाने सर्वत्र नुकसान झाले असताना मुख्यमंत्री राज्यात केवळ सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दाेनच जिल्ह्याचा दौऱ्यावर का येत आहेत असा पलटवार विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देवगड येथे येवुन चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त मच्छिमार, आंबा बागायतदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांचासमवेत विधान परिषद विराेधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, जि.प.अध्यक्षा साै.संजना सावंत, माजी आमदार अ‍ॅड.अजित गाेगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संताेष किंजवडेकर, डाॅ.अमाेल तेली, सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर, नगराध्यक्षा साै.प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, माजी सभापती सुनिल पारकर आदी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित हाेते. यावेळी मच्छिमार नेते भाई खाेबरेकर, ज्ञानेश्वर खवळे, संजय बांदेकर यांनी चक्रीवादळावेळी प्रशासनाकडून मच्छिमारांना काेणतेही सहकार्य करण्यात आले नाही.

वादळाची पुर्वसुचना देण्यात आली मात्र प्रत्यक्षात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सहकार्य करण्यास नव्हती याकडे लक्ष वेधले. वादळाची पुर्वसुचना असताना येथे एन्.डी.आर.ए् चे पथक तैनात केले असते तर आपत्तीची तीव्रता कमी झाली असती.राजकीय टीकाटीप्पणी करणेपेक्षा शासनाने वेळीच यंत्रणेच्या माध्यमातुन सुरक्षा पुरविली असती तर मच्छिमारांवर माेठी आपत्ती ओढवली नसती. नुकसानीच्या केवळ कागदावर नाेंदी आवश्यक नसुन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची नाेंद प्रशासनाने केली पाहिजे.मच्छिमारांच्या नाैका उध्वस्त झाल्या त्यांना 40-50 लाख रूपये नुकसानी मिळाली पाहिजे.प्रशासन गतीमान असले पाहिजे त्यावर वचक असला पाहिजे असे मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री घराबाहेर पडले यातच समाधान आहे असा टाेला त्यांनी लगावला.मात्र नुसते दाैरे केले मात्र दिले काही नाही.निसर्ग वादळाची नुकसानभरपाई अजुन दिली नाही.त्यामुळे नुकसानीचे याेग्य पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई नुकसानग्रस्तांना दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कुणकेश्वर येथे नुकसान झालेल्य आंबा बागायतींचीही पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page