वेंगुर्ला /-

भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे. गोव्यातील चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला निवती रॉक दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या थरारक शोर्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तटरक्षक दलानं ट्विटकरून याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

कोस्ट गार्ड एअर स्टेशन दमण येथून निघालेल्या कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर चेतकने सातपाटी जीएएल कन्स्ट्रक्टरच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या सर्व 138 कर्मचाऱ्यांची सुटका केली. तटरक्षक दलाने अत्यंत जबाबदारीने आणि सुयोग्य व्यवस्थापनासह ही कामगिरी पार पाडली. यासह हे बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले. तर, कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह गोवा येथून निघालेल्या आणखी एका चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला दीपगृहातील दोन कर्मचाऱ्यांना वाचवले.या सर्वांना यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आले. तौक्ते वादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि बदलत्या हवामानामुळे समुद्र खवळला यामुळे येथील विद्युतदपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. तसे दीपगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page