शिवसेना बॅनरवर नव्हे तर जनतेच्या हितासाठी संकटकाळात रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना- हरी खोबरेकर.

मालवण /-

जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून मालवण तालुक्यातील पोईप शिवसेना विभागाच्या वतीने विरण येथे या रक्तदान’शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्याला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते रक्तदानासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे काजूचे झाड देऊन सन्मानित करण्यात आले व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.यावेळी बोलताना हरि खोबरेकर म्हणाले की शिवसेना बॅनरवर नव्हे तर जनतेच्या हितासाठी संकटकाळात रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, नाना नेरूरकर,किरण प्रभु,पराग नार्वेकर, श्रीकृष्ण पाटकर, पंकज वदम, आनंद चिरमुले, भाऊ चव्हाण,दया नेरूरकर,बाबली पालव ,बाबु टेंबुलकर,सतिश राठोड, गणेश नेरूरकर,अक्षय दाभोळकर, केतकी प्रभु, बबलू वेंगुर्ले,दिपक मसदेकर, अमित कुशे जयेश नार्वेकर,ज्ञानेश्वर वाडकर,उपस्थित होते.कोरोना सारख्या भिषन काळात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे‌ डॉक्टरांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page