कुडाळ /-

सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोनाची परिस्थिती भयंकर गंभीर असून दररोज रूग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढते आहे अशा वेळी रूग्ण संख्या कमी होण्यासाठी आरोग्य यंञणेवर काही प्रमाणात मर्यादा येत आहे. अपूरा कर्मचारी वर्ग अपुरी यंञसामुग्री औषधांचा तुटवडा.बेडची कमतरता यामुळे रूग्णांना वेळीच उपचार होण्यास दिरंगाई होत आहे.अशा परिस्थितीत आरोग्य यंञणेवर मर्यादा येत आहेत.अहमदनगर नगरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघात ज्या पद्धतीने एक हजार बेडचे कोवीड सेंटर उभारून तेथील कोवीड रूग्णांना ज्या पद्धतीने दिलासा दिला त्याच प्रकारे सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी आमदार निलेश लंके सारखा आदर्श घेऊन सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोवीड ग्रस्त रूग्णांना मदत करावी.

राजकारण करण्यासाठी भरपूर वेळ आहे. माञ आज जनतेला आधार देण्याची नितांत गरज आहे. म्हणून या कोरोना संकटातून जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी सर्व राजकीय मतभेद यावेळी बाजूला ठेवून एकञ येण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसही तुमच्या सोबत आहे. माञ कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्य़ातील कोरोनाची महाभयंकर साथ पूर्णतःहा हद्दपार करण्यासाठी सर्वानी एकञ येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. यापूर्वी या जिल्ह्य़ात अनेक संकटे आली त्या त्या वेळी सर्व पक्षानी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शक्य होईल तसे योगदान देऊन सहकार्य केले होते.

तसेच यावेळी सर्वानी एकञ यावे. लवकरच यावर निर्णय घेऊन सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील सर्व पक्षीय नेते व लोकप्रतिनिधींनी आम्ही सुद्धा कठीण प्रसंगात सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही या कठीण प्रसंगी जनते सोबत आहोत याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहेत.जनता सुरक्षित राहिली पाहिजे.हे महत्त्वाचे आहेत.सद्धस्थितीत जिल्ह्य़ात शिवसेना.भाजप यांचे आमदार कार्यरत आहेत.त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे.असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर यांनी मीडिया शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page