कुडाळ /-

नॅशनल हायवे क्रमांक ६६ च्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये कुडाळ सांगिर्डे येथील कथीत इमारत क्रमांक ४०५६ चा काहीही संबंध नसताना संपादित प्रकियेत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांनी संगनमताने इमारत क्रमांक ४०५६ ही संपादन प्रक्रियेत दाखवून सुमारे ५० लाख रुपयांचे जनतेच्या कररूपी पैशांचा भ्रष्टाचार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उघडकीस आणून सदर प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व दिलेली रक्कम वसूल करावी. अशी मागणी कुडाळ. प्रांत वंदना खरमाळे यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे १४ व २० ऑक्टोबरला संबंधितांना स्वयंस्पष्ट अहवाल व अभिप्राय सादर करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित कार्यालयाकडून अद्याप स्वयंस्पष्ट अहवाल व अभिप्राय प्राप्त झाला नाही.म्हणून ५ नोव्हेंबर रोजी पुन्हा स्मरणपञ पाठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
_*तर घंटानाद आंदोलन करणार*_
वरिल प्रकरणी २१ नोव्हेंबर पर्यंत निर्णय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कुडाळ प्रांत कार्यालय येथे २३ नोव्हेंबर रोजी पासून सत्यसाईबाबांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून घंटानाद आंदोलन सुरू करणार.
_*पुढिल पोस्टमार्टेम सांगिर्डे ते झाराप झिरो पाँईट.*_
लवकरच सांगिर्डे ते झाराप झिरो पाँईट मधिल अन्य प्रकरणांचीही पुराव्यानिशी चौकशीची मागणी करणार.असल्याचे सांगून
४०५६ या इमारती प्रमाणे अजून अनेक कथीत इमारती दाखवून शासकीय निधीचा अपहार केला आहे.तेही जनतेसमोर आणणार.याबाबत लवकरच जिल्हाधिकारी व प्रांत यांना निवेदन देऊन अन्य कथीत इमारती शोधून काढण्याची मागणी करणार.कुडाळ सांगिर्डे ते झाराप झिरो पाँईट नंतर कुडाळ ते कसाल संपादन प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकणार . असल्याचे सांगून न्याय मिळे पर्यंत या प्रकरणी लढणार असल्याचे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भास्कर परब व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी सांगितले.
_*कुडाळ प्रांत कार्यालयातील आयुक्तांच्या चौकशीचे झाले काय ?*_
कुडाळ प्रांत कार्यालयातील चौकशी ज्या समितीने केली होती त्या समितीचीच चौकशी आयुक्त स्तरावरून करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.त्यानुसार चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी अमान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसने चौकशी समितीचीच चौकशी आयुक्त स्तरावरून करण्याची मागणी केल्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आयुक्त कार्यालयाकडे चौकशी करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाचे पुढे काय ? झाले, आयुक्त स्तरावरून चौकशी कधी होणार ? याचाही खुलासा जिल्हाधिकारी यांनी लवकरच करावा.अशी मागणी भास्कर परब व बाळ कनयाळकर यांनी केली आहे.